Skip Navigation Links
Home
Contact Us
About Us
Examinations
Exam-Info
Results
Tenders
                    
 
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
 
   महाराष्ट्र शासनाच्या शालेय शि़क्षण विभागाच्या वतीने प्राथमिक स्तरापासूण ते व्यावसायिक स्तरापर्यंत विविध शिष्यवॄत्ती अर्हता, व्यावसायिक अर्हता परिक्षा आणि शिक्षण विभागातील शासकीय कर्मचारयांसाठी सेवाप्रवेशोत्तर विभागीय परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद करित असते. याचबरोबर इतर विभागांसाठीच्या विविध परिक्षांचे संविदा तत्त्वावर परिषदेने आयोजन केले आहे.
उदा: १)प्राथमिक शि़क्षण सेवक भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा
२) कॄषि विभागातील कॄषिसेवक, सहायक अधिक्षक ,वरिष्ठ लिपिक या पदांसाठी लेखी परिक्षा-(२००४ आणि २००८)३) अपर आयुक्त,आदिवासी विकास विभाग, ठाणे य़ांची गृहपाल/अधिक्षक, शि़क्षण सेवक इ. रिक्त पदे भण्यासाठी लेखी परिक्षा इ. शि़क्षण संचालयामार्फ़त घेतल्या जाणरया विविध परीक्षांची जबाबदारी १९६८ पासून शासकीय परीक्षा मंड्ळाकडे सोपविलेली आहे. या संस्थेचे १९९६ पासूण "महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद" अधिनियम १९९८ नुसार दि.१३ ऑगस्ट २००२ च्या अधिसूचनान्वये दि.१५.०८.२००२ पासून "महाराष्ट्र राज्य परीक्षा मंड्ळाचे" "महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद" या स्वायत्त संस्थेत रुपांतर केले आहे. परीक्षा परिषद दरवर्षी १२,००० परीक्षा केंन्द्रावर राज्यातील अंदाजे ६६,००० प्राथमिक शाळांशी, १५,००० माध्यमिक शाळांशी, १६८६ टंकलेखन सस्थांशी आणि ७९२ अध्यापक विध्यालये व ३ टीटीसी विध्यालयांशी संबंधित साधारणतः २४ लाख विध्या १४ प्रकारच्या परीक्षा वर्षभरात २० वेळा आयोजित करते . परीक्षा परिषदेमार्फ़त घेतल्या जानारया सर्व परीक्षांचे आयोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) तसेच सर्व क्षेत्रिय अधिकारी, शिक्षण उपसंचालक याचेंमार्फ़त केले जाते. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावर दर्जेदार वस्तुनिष्ट परीक्षांद्वारे गुणवत्तेचा शोध घेणे हे परिषदेचे ध्येय आहे.
   
                  
   
         

Last update on 08/08/2013
Best viewed @ 1024 x 768 pixels

Copyright © Maharashtra State Examination Council.All rights are reserved